। अहमदनगर । दि.21 जुलै 2023 । एस टी बसने प्रवास करण्यासाठी बसमध्ये प्रवेश करणार्या महिला प्रवासाच्या गळ्यातील पर्समधून 66 हजार रुपये किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेला आहे. ही घटना येथील माळीवाडा बस स्थानका परिसरात घडली आहे.
शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने मनपा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
या बाबत मिळालेली माहिती अशी की, पाथर्डी येथील सुंदरबाई सुदर्शन शिरसाठ (वय 30 राहणार पिंपळगाव टप्पा, तालुका पाथर्डी. हल्ली राहणार अंबाला कँट, हरियाणा) या त्यांच्या गावी एस टी बसने जाण्याकरिता बसमध्ये बसण्यासाठी मुलीला कडेवर घेऊन. पर्स गळ्यात लटकावून बॅग घेऊन बसमध्ये प्रवेश करीत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पर्स चोरली.
नेप्ती नाक्यावर साडेबारा लाखाची विदेशी दारु पकडली
पर्समध्ये 7 हजार 500 रुपये,सोन्याचे दागिने, वीवो कंपनीचा मोबाईल, एटीएम कार्ड, रेल्वे रिझर्व्हरेशन तिकीट, आधारकार्ड, पँनकार्ड, डीपेंडन्ट कार्ड, असा 66 हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सूंदरबाई शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस नाईक थोरात करीत आहे.
गावात स्मशानभूमीच्या जागेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावेत
