नेप्ती नाकवर साडेबारा लाखाची विदेशी दारु पकडली
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोघांविरुध्द गुन्हा दाखल
। अहमदनगर । दि.20 जुलै 2023 । अवैध विदेशी दारुची वाहतूक करणार्या दोघांना जेरबंद केले आहे. बाबू लखुभाई राठोड, (रा. राजकोट, राज्य गुजरात), सिध्देश संदीप खरमाळे (रा.भांडगांव, ता. पारनेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून 27 लाख 44 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष लोढे, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन अवैध धंद्याची माहिती घेवुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस पथक शहर परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोनि आहेर यांना आयशर कंपनीचे विटकरी रंगाचे टेम्पोमधुन गोवा राज्यातून विदेशी कंपनीची दारु महाराष्ट्रात विक्रीचा परवाना नसताना विना परवाना बेकायदेशिरित्या नगर कल्याण रोडने अहमदनगर कडे येत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने नगर कल्याण रोडने जावुन नेप्ती नाक्याजवळ सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला.
पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी गाडीचे केबिनमध्ये दोन इसम बसलेले पथकास दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन, आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विदेशी दारुचे बॉक्स असल्याची खात्री होताच. दोन्ही इसमांना विदेशी दारु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस करता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 3 लाख 45 हजार 600 रुपये किंमतीचे मॅकडॉल्स व्हीस्की 180 मिलीचे 48 बाक्स, 3,45,600/- रुपये किंतीचे मॅकडॉल्स व्हीस्की 750 मिलीचे 48 बाक्स, 1,90,080/- रुपये किंमतीचे रॉयल स्टँग 180 मिलीचे 22 बाक्स, 1,90,080/- रुपये किंमतीचे रॉयल चॅलेज 750 मिलीचे 22 बाक्स, 1,72,800/- रुपये किंमतीचे रॉयल चॅलेज 180 मिलीचे 20 बाक्स व 15,00,000/- रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा विटकरी रंगाचा टेम्पो असा एकुण 27 लाख 44 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1050/23 मपोकाक 65 (अ) (ई), 80, 83, 90 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
