युवकाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या


। अहमदनगर । दि.24 जुलै 2023 । नगर शहराजवळील नागापूर येथील ३१ वर्षीय तसेच नगर तालुक्यातील अंबिलवाडी येथील ३० वर्षीय युवक अशा दोघांनी आपआपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी (दि.२१) उघडकीस आल्या आहेत.

शशिकांत सुधीर गायकवाड (वय ३१, रा. सेंट मेरी चर्च जवळ, नागापूर) व नवनाथ भास्कर काळोखे (वय ३०, रा. अंबिलवाडी, ता.नगर) अशी आत्महत्या केलेल्या युवकांची नावे आहेत. यातील नवनाथ काळोखे याने गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ६ च्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला.

ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉ. कुलकर्णी यांनी त्यास उपचारापुर्वीच मृत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२१) पहाटे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post