लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा!...


। मुंबई। दि.02 एप्रिल 2026  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना केवायसी प्रक्रियेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ मार्चपूर्वी केवायसी दुरुस्ती पूर्ण न करू शकलेल्या महिलांना आता अतिरिक्त मुदत देण्यात आली असून, त्या ३० एप्रिल २०२६ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत.राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.


याबाबत माहिती देताना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी सांगितले की, अनेक महिलांना तांत्रिक अडचणी व कागदपत्रांतील त्रुटींमुळे वेळेत केवायसी पूर्ण करता आले नव्हते. त्यामुळे लाभार्थींना अडचण येऊ नये यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.


या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो महिलांना दिलासा मिळणार असून, लाभ सुरू ठेवण्यासाठी उर्वरित लाभार्थींनी निर्धारित कालावधीत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post