। अहमदनगर । दि.07 जुलै 2023 । महावितरणकडून उद्या (शनिवार) मुळाडॅम वाहिनीवरील दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरासह उपनगरातील पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत होणार आहे.
शनिवारी (दि.8) रोजी बोल्हेगाव, नागपूर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव रोड, केडगाव, नगर-कलण सत्यावरील शिवाजीनगर आदी भागात सकाळी 11 नंतर पाणीपुरवठा होणार नाही.
आणखी एक मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरे यांची साथ
याभागात रविवारी (दि.9) पाणी पुरवठा केला जाणार आहे. मंगलगेट, रामचंद्रखुट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडाई, काळू बागवाण गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी, आगरकरमळा, स्टेशन रोड, विनायकनगर, गुलमोहर रोड,
प्रोफेसरकॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर, म्युन्सिपल हाडको, या भागात रविवारी ऐवजी सोमवारी (दि.10) रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे. सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव चितळेरोड, आनंदीबाजार, कापडबाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड आदी भागात सोमावार ऐवजी मंगळवार (दि. 11) रोजी पाणीपुरवठा होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन
Tags:
Ahmednagar
