केडगाव येथील गोडाऊन फोडून खताच्या तब्बल ३९० गोण्या पळविल्या


। अहमदनगर ।  दि.21 जून । नगर- पुणे रोडवरील केडगाव शिवारातील खताचे गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ लाख ९० हजार रूपये किमतीच्या २४:२४:० या रासायनिक खताच्या ३९० गोण्या चोरून नेल्या आहेत. दि.१६ जून रोजी दुपारी साडे चार ते १८ जून रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस परेड मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

याबाबत गुरूविंदरसिंग गुरबच्चनसिंग वाही (वय ५७ रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.  फिर्यादी वाही यांनी नगर- पुणे रोडवरील केडगाव शिवारात डिएसके टोयाटो शेजारी बोथरा गोडाऊन भाडोत्री घेतलेले आहे. सदरच्या गोडाऊनमध्ये खताच्या गोण्या होत्या. त्यांनी ते गोडाऊन १६ जून रोजी दुपारी साडे चार वाजता बंद केले होते. 

अपहरण करुन व्यापार्‍याला लुटणारी टोळी गजाआड 

त्यानंतर चोरट्यांनी गोडाऊनचे लॉक तोडून ३ लाख ९० हजार रूपये किमतीच्या ३९० गोण्या चोरून नेल्या आहेत. दि.१८ जून रोजी दुपारी एक वाजता हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी बस चालकास जबर मारहाण 

Post a Comment

Previous Post Next Post