मुली व महिला खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
पहिल्यांदा जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने महिलांना बुद्धिबळाचे प्राधान्य
। अहमदनगर । दि.31 मे 2023 ।रविवारी दि. ४ जुन रोजी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जुन्या कापड बाजार येथिल नागर महाजन वाडी कार्यालय येथे सदरील स्पर्धेचे नियोजन केले असून रविवार दी. ४ जुन रोजी सकाळी १० वाजता पहिल्या फेरीचे उद्घाटन होणार तर जुन महिन्यात होणाऱ्या महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अहमदनगर जिल्ह्याचा मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार असून अंतिम निकाला प्रमाणे २ मुली, प्रथम २ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील.
शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या समन्वय समितिची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक संपन्न
जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी,रू १०००/- संघटनेमार्फत भरली जाईल, तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार असून पहिल्या पाच खेळाडूंना आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून सदरील स्पर्धा मुली व महिला खेळाडूं साठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी सोबत आणावे व प्रवेश ऑनलाईन किंवा वॉट्अप वर स्वीकारले जाणार असून
नगर दक्षिणेतून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी : किरण काळे
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. सदर निवड चाचणी स्पर्धेतील प्रवेश नोंदणी करता व अधिक माहितीकरिता यशवंत बापट सर ९३२६०९२५०१, पारूनाथ ढोकळे सर ९८५०७०४२६८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत दक्षिणेतील उमेदवार घोषित करण्याची मागणी
