शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या समन्वय समितिची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक सपन्न
जुलैमधे मुंबईत पदाधिकारी मेळावा तर ऑगस्टमधे महामेळावा
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांची माहिती
। मुंबई । दि.30 मे 2023 । शिवसेना भवन दादर मुंबई येथे शिवसेना - संभाजी ब्रिगेड समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना- संभाजी ब्रिगेड पदाधिकारी संयुक्त मेळावा उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करणे आणि ऑगस्टमधे शिवसेना-संभाजी ब्रिगेड संयुक्त महामेळावा आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होणारे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीची रणनीती व पुढील राजकीय दिशा ह्यावर चर्चा झाली. त्याचबरोबार आगामी सर्व निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात त्या त्या वेळी निर्णय घेतले जातील. असे ठरले.
या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा.सुभाष देसाई,मा.अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.ना.अंबादास दानवे, मा.अनिल देसाई,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अड.मनोज आखरे, महासचिव मा.सौरभ खेडेकर,प्रवक्ते मा. गंगाधर बनबरे, डॉ.शिवानंद भानुसे.उपस्थितित होते.

