। अहमदनगर । दि.08 मे 2023 । एमआयडीसी परिसरात घरफोडी, जबरी चोरी करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना जालना येथून जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गजानन उर्फ गजू विष्णू गवारे (वय 31 वर्षे रा. बुटेगाव ता. बदनापूर, जि. जालना), ऋषिकेश नबाजी गांगर्डे (वय 28 वर्षे, रा. बुटेगाव, ता. बदनापूर, जि. जालना) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही सराईत गुन्हेगारांना बुटेगाव, जालना येथून अटक करण्यात आली असून, त्यातील गवारे याच्या राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवनागापुर येथे फिर्यादी नामे संगिता कचरु पालवे (वय 35 वर्षे, धंदा घरकाम, रा. चेतना कॉलनी नवनागापूर, ता. जि. अहमदनगर) यांची घरासमोर लावलेली अॅक्टीव्हा (एम एच 17 बी सी 1800) ही तसेच घराचे दरवाज्याचे लॉक तोडून प्रवेश करुन सोन्याचे झुंबर तसेच लॉकेटअसा एकुण 33 हजार रुपयांचा एकुण मुद्देमाल चोरुन नेला होता. आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे 1)गजानन उर्फ गजु विष्णु गवारे रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना 2) ऋषिकेश नवाजी गांगर्डे रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना यांनी केला असुन ते जालना जिल्हयात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना मा. पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांचे आदेशाने जालना येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना येथून सदर आरोपींना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.
त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) गजानन उर्फ गजु विष्णु गवारे वय 31 वर्ष रा. बुटेगाव ता.बदनापुर जि.जालना 2) ऋषिकेश नबाजी गांगर्डे वय 28 वर्ष रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना असे सांगीतले. सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरी केलेली मोपेड गाडी नंबर एम एच 17 बी सी 1800 जप्त करण्यात आली आहे. व जालना येथुन चोरी केलेली स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्याबाबत जालना येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील चोरी गेलेले सोने हस्तगत करत आहोत. सदरचे आरोपी हे सराईत असुन त्यांचेवर विविध गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (नगर ग्रामिण विभागा) अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई राजेद्र गायकवाड, सफौ रावसाहेब लोखंडे, पोना आंधळे, पोकॉ किशोर जाधव, पोकों/सुरज देशमुख, पोकों सचिन हरदास तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे मपोना रिंकु मढेकर, पोकॉ प्रशांत राठोड, पोकॉ नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.
- नेप्ती शिवारातील गावठी हातभट्टी दारुधंदे उध्वस्त
