। अहमदनगर । दि.7 मे 2023 । न्यू लॉ कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला फलके -जोशी यांचा हृदय सत्कार संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पा. यांच्या हस्ते आणि सचिव जी. डी. खानदेशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत : पालकमंत्री
याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला फलके-जोशी यांनी वकिली क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून या त्रिसुत्रीचा अवलंब करून मी जीवनात यशस्वी झाले. माझ्या यशामध्ये संस्था व संस्थेचे दिवंगत आणि विद्यमान पदाधिकारी व विश्वस्तांचा फार मोठा वाटा आहे, असे सांगितले.
इंजि. विजयकुमार ठुबेंनी मराठा समाजाला दिशा देण्याचे काम केले : किरण काळे
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी त्यांच्या भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्था महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जात असून, संस्थेच्या जडणघडणीत जुन्या आणि त्यागी पदाधिकाऱ्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी उच्च न्यायालयाची न्यायमूर्ती होते, ही बाब निश्चितच महाविद्यालयासाठी भूषणावह आहे. त्यायोगे आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केले.
सक्षम व सुदृढ समाज निर्मितीसाठी मोफत शिबीर काळाची गरज : पो.नि. राजेंद्र सानप
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असून, आमच्या हयातीत महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्वाच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होतील, असे प्रयत्न महाविद्यालयाने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नगर शहरातील झाडांच्या रंगरंगोटीचे काम सुरु
संस्थेचे सहसचिव व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲड. विश्वासराव आठरे पा. यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेच्या नगर शहरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय आणि विधी महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण करणारी एक विद्यार्थिनी आणि माझी सहकारी उच्चपदावर विराजमान होते, ही संस्थेसाठी आणि महाविद्यालयासाठी भूषणावह बाब आहे. विद्यार्थ्यांनी योग्यवेेळी संधी ओळखून त्याचे रूपांतर यशात करावे.
कामगारदिनी महावितरणच्या ६९ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त ॲड. दीपलक्ष्मी म्हसे पा., सीताराम खिलारी, मुकेशदादा मुळे, जयंत वाघ आणि संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲड. माणिकराव मोरे, श्रीमती अरुणा काळे, ॲड. सुभाष भोर यांच्यासह सचिन जोशी आणि प्रा. डॉ. बाळासाहेब सागडे, अशोक गुर्जर, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. मोदगीकर, अँड. प्रभाकर धिरडे उपस्थित होते.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. तांबे यांनी केले. क्रिडा विभाग आणि शैक्षणिक व बिगर शैक्षणिक कार्यक्रमाचा अहवाल अनुक्रमे प्रा. सुनिल जाधव आणि प्रा. डॉ. बी. डी. पांढरे यांनी सादर केला. पारितोषिकांचे वाचन प्रा. आर. बी. दुसुंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
