एमआयडीसी प्लॉटमधून लोखंडी सळयांची चोरी


। अहमदनगर । दि.17 मे 2023 । नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील शिंगवे तुकाई एमआयडीसी एफ डी 70 मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने अक्षरा इंटरप्राईजेस आरसीसी बांधकाम करण्यासाठीच्या आठ एमएम गाडीचे 50 किलो, बारा एमएम गाडीचे 504 किलो, 16 एमएम गाडीचे 461 किलो, वजनाच्या सळया चोरून नेल्या. 

याप्रकरणी सोनई पोलिसांनी प्रसाद पंढरीनाथ कदम ( राहणार डोंगरगण एमआयडीसी नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस नाईक तुपे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post