‘मेकिंग मुंबई इनक्ल्युझिव्ह’ मोहिमेचा मंत्रालयात शुभारंभ
। मुंबई । दि.21 एप्रिल । दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी महानगरपालिकांच्या मैदानांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर शासनाचा भर असून, त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित राज्य शासन, मुंबई महानगरपालिका व प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समावेश-मेकिंग मुंबई इनक्ल्युझिव्ह मोहिमे’चा शुभारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी दिव्यांगांना व्हिलचेअरचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या बास्केटबॉलचा विशेष सामनाही यावेळी झाला.
कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रोजेक्ट मुंबई उपक्रमाचे संस्थापक शिशिर जोशी यांच्यासह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
----
💥 शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा
💥 मराठा पतसंस्थेचे 30 कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण चालु आर्थिक वर्षात 35 लाखांचा ढोबळ नफा
💥 ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमात दाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी : महिला व बालविकास मंत्री
