मराठा पतसंस्थेचे 30 कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण चालु आर्थिक वर्षात 35 लाखांचा ढोबळ नफा

। अहमदनगर । दि.20 एप्रिल । मराठा सेवा संघ प्रणित, अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सह.पतसंस्थेचे मार्च 2023 अखेर रक्कम रुपये 30 कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून सन 2022-23 या अहवाल वर्षात रुपये 35 लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन इंजि.विजयकुमार ठुबे यांनी दिली.

संस्थेने 31 मार्च अखेर एकूण रुपये 23 कोटी चे कर्ज वितरण केले असून, रक्कम रुपये 8 कोटी 53 लाखाची गुंतवणुक केलेली आहे. पतसंस्थेने वसूली बाबतही आघाडी कायम राखली असून, संस्थेच्या शाखांपैकी संगमनेर, नेवासा, शेवगांव, भिंगार या शाखांनी एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे.

संस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे म्हणाले की, पतसंस्थेने अहवाल सालात रक्कम रुपये 144 कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे. संस्थेला शेवगांव व कर्जत शाखेस मंजुरी मिळाली असून, अहवाला सालात शेवगांव शाखेचा शुभारंभ झाल्यानंतर महिना भरात 90 लाखांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे म्हणाले की, अहवालात सालामध्ये मराठा सेवा संघ व पतसंस्थेच्या वतीने समाजातील गुणवंतांचा गौरव, जीवन गौरव पुरस्कार आदि उपक्रम राबविण्यात आले. संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांनी केलेले कामकाज निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

Previous Post Next Post