। अहमदनगर । दि.21 एप्रिल । मध्यरात्री सिध्दार्थनगर परिसरातील नीलक्रांती चौकात हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्या अल्पवयीन मुलाला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक तलवार जप्त केली आहे. त्याच्याविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलिसांकडून मंगळवारी रात्री गस्त सुरू असताना सव्वा एक वाजता नीलक्रांती चौकात एक अल्पवयीन मुलगा हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती गस्ती पथकाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन रणदिवे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Tags:
Crime
