। मुंबई । दि.27 एप्रिल । भाकरी शेकताना तिला फिरवावी लागते. फिरवली गेली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी हे सूचक विधान केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी सत्ताबदलाचे एक मोठं वक्तव्य केलं आहे. “भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. जास्त विलंब करुन चालणार नाही” असं सत्ताबदलाचे मोठे संकते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
----
💥 नितेश राणेंविरोधात आंबेडकरी जनतेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी
💥 राजमाता जिजाऊ सहकार पॅनलचा दनदणीत विजय
💥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार चळवळीला भक्कम पाठबळ दिले
