नितेश राणेंविरोधात आंबेडकरी जनतेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी

। अहमदनगर । दि.25 एप्रिल । नगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर शिविगाळ करणाऱ्या आमदार नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, या ‘टिल्लू आमदाराचे करायचे काय खाली डोके वर पाय’, देशाचे संविधान वाचवा अशा घोषणा देत व निषेधाचे फलक फडकवत सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने आज तारकपूर येथून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा देण्यात आला. 

यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदन शहर पोलीस विभागाच्या पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी स्वीकारले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, शाहू, फुले आंबेडकरांचा विजय असो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये निषेधाचे फलक घेत सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध सुद्धा केला. महानगरपालिकेचे आयुक्त यांना आमदार नितेश राणे यांनी शिवीगाळ केली त्या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी केली.

तसेच देशांमध्ये सध्या संविधानाचा गैरवापर केला जात असून भविष्यात संविधान वाचवण्याची वेळ घेऊन आता येऊन ठेवलेली आहे असं म्हणत सरकारने सुरू केलेल्या हुकूमशाहीचा निषेध सुद्धा यावेळी करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post