राजमाता जिजाऊ सहकार पॅनलचा दनदणीत विजय

। अहमदनगर । दि.24 एप्रिल । अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षी निवडणुक नुकतीच पार पडली.  यामध्ये पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विजयकुमार ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उभा असलेल्या राजमाता जिजाऊ पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. 

दि अंबिका महिला बँकेस दोन कोटी सहा लाखाचा ढोबळ नफा

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच पार पडली. गेल्या महिन्याभरात सुरु असलेली ही निवडणुक आरोप प्रतिआरोपांनी गाजली. या निवडणुकीत एकूण 34 उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार

यामध्ये राजमाता जिजाऊ पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत सर्व सभासदांनी दाखवलेला विश्वासाबद्दल इंजि.ठुबे यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वांना बरोबर घेऊन संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरुच राहिल यात शंका नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. 

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा : भानुसे 

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : ठुबे विजयकुमार गोविंदराव, पांडुळे दत्तात्रय ज्ञानदेव, अनभुले ज्ञानेश्वर भाऊसाहेब, काळे बाळकृष्ण मारुती, इंगळे सतीश शंकरराव, राजेभोसले द्वारकाधीश उत्तमराव, सोनाळे लक्ष्मण भानुदास, सोनाळे बाबासाहेब दशरथ, डोंगरे काशिनाथ कुंडलिक, मते संभाजी मोहिनीराज, पायमोडे किसन सखाराम, शिंदे यशवंत जयवंतराव, ठुबे कल्पना शरद, शितोळे राजश्री रवींद्र, मरकड किशोर मोहनराव, कावरे राजेश दत्तात्रय या सर्व सोहळा उमेदवारांचा विजय झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post