। अहमदनगर । दि.26 एप्रिल । दरोड्याच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले १८ तोळे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोतवाली पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी पकडून त्यांच्याकडून जप्त केले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर कोतवाली पोलिसांनी फिर्यादीस परत दिले.
या बाबतची माहिती अशी कि दि. डिसेंबर २०२२ रोजी मध्यरात्री, नगर कल्याण रोड, वरील गाडळकर मळा विद्या कॉलनी अ.नगर व आगरकर मळा, स्टेशन रोड, अ.नगर ठिकाणी अनोळखी सहा ते सात आरोपीनी यश उमेश शेळके ( वय २२ वर्षे रा. प्लॉट नं.१४८, विद्या कॉलनी, नगर कल्याण रोड, अहमदनगर ) व साक्षीदार यांचे घरांचे आतून बंद असलेले दरवाजे कडी कोयंडे कटावणीने तोडून घरात प्रवेश करून घरातील लोकांना यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे घरातील एकुण ४ लाख ३० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याबाबत यश शेळके व आकाश सुभाष सूर्यवंशी ( रा.गाडळकरमळा, सुयोग पार्क, नगर कल्याण रोड, अ.नगर,वसंत रभाजी चांदणे ( वय ४८ वर्षे ) राजु गंगाधर पडोळे ( वय ४८ वर्षे दोन्ही रा.रंगनाथ रेसीडेन्सी, आगरकर मळा, अ.नगर ) यांनी कोतवाली पोलीस ठाणे येथे सहा अनोळखी आरोपींवरूध्द फिर्याद दिल्याने अनोळखी सहा आरोपींविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास पोलीसांनी करून रावण ऊर्फ छनक नादर चव्हाण ( वय ३४ वर्षे ), फिलीप नादर चव्हाण ( वय २५ वर्षे ), प्रशांत ऊर्फ धोळया घुमीर ऊर्फ सुधीर चव्हाण, सचिन ऊर्फ जुगल्या घुमीर ऊर्फ सुधीर चव्हाण, सचिन उर्फ जुगल्या घुमीर ऊर्फ सुधीर चव्हाण, गणेश दिवाणजी काळे ( रा. वाकोडी ता. जि. अहमदनगर ) निबांळकर आसाराम भोसले ( मुळ रा. चिंचोडी पाटील ता. जि. अ.नगर ) असे असल्याची निषन्न करून त्यांचा शोध घेतला असता त्यांचेपैकी रावण ऊर्फ छनक नादर चव्हाण, फिलीप नादर चव्हाण, निबांळकर आसाराम भोसले हे मिळून आल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील गेल्या एकुण १८.तोळे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून जप्त केले.
गुन्हयातील जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर मुद्देमाल त्यांचे ताब्यात देणेबाबतचा आदेश प्राप्त करून घेतला आहे. या आदेशात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. ५, अ. नगर यांनी जप्त किमती मुद्देमाल फिर्यादी यांचे ताब्यात देणेबाबत पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे, अ.नगर यांना आदेशित केले. त्याप्रमाणे फिर्यादी शेळके यांना गुन्हयातील आरोपी यांचेकडून जप्त केलेला एकुण १८ तोळे १ ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने असा किंमती मुद्देमाल परत करण्यात आला
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन, सहायक फौजदार. सरोदे, पोलिस हवालदार दिपक साबळे, पोलिस हवालदार भिंगारदिवे, व पोलिस कॉन्स्टेबल याकुब सय्यद यांनी केलेली आहे.
