भिंगार बँकेस बँको ब्ल्यू रिबनचा राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट बँक पुरस्कार


। अहमदनगर । दि.07 मार्च । भिंगार अर्बन बँकेस बँको ब्ल्यु रिबनचा ‘उत्कृष्ट बँक पुरस्कार’ स्विकारतांना बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे, व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, अविनाश शिंत्रे, गुंडाळे, बँकेचे संचालक नाथाजी राऊत, रमेश परभाणे, विजय भंडारे, विष्णू फुलसौंदर, नामदेव लंगोटे, कैलास खरपुडे, अमोल धाडगे, संदेश झोडगे, एकनाथ जाधव, आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, राजेंद्र पतके, कांताबाई फुलसौंदर, तिलोत्तमा करांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन आदि उपस्थित होते.

बँको संस्थेच्यावतीने देशातील विविध राज्यातील बँकांसाठी विविध निकषांवर हे पुरस्कार देण्यात येत असतात. यामध्ये ठेवी, जुनी बँक, एनपीए आशा विविध निषक होते. देशातील विविध बँकांचे परिक्षण करुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या निवडी समितीत रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी असतात.

भिंगार बँकेने सातत्याने ऑडिटवर्ग ‘अ’ मिळविला आहे, त्याचबरोबरच बँकेचा एनपीही शून्य असल्याने त्याचबरोबर बँकेने अत्याधुनिक सुविधांचा उपयोग करुन ग्राहकाभिमुख सेवा दिली आहे. त्यामुळे बँकेला सलग दुसर्‍या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले, भिंगार बँकेला शतकेत्तर सेवेची परंपरा असून, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्याने बँकेने अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याने सर्वच कसोट्यावर बँक उत्कृष्ट ठरत आहे. 

सर्व संचालकांच्या एकत्रित प्रयत्न आणि कर्मचार्‍यांची साथ यामुळे बँकेची दिवसेंदिवस नेत्रदिपक प्रगती होत आहे. या सर्व बाबींमुळे बँकेला विविध क्षेत्रातून कौतुक होऊन पुरस्कार मिळत आहे. आज राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या लौकिकाम एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे, अनिलराव झोडगे यांनी सांगितले.

भिंगार बँकेस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन, सर्व संचालक मंडळाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post