खासदार निधीतून केडगाव अमरधाममध्ये विद्युतदाहिनी उपलब्ध करून द्यावी : जालिंदर कोतकर

खासदार निधीतून केडगाव अमरधाममध्ये विद्युतदाहिनी उपलब्ध करून द्यावी

खा. सुजय विखे यांच्याकडे जालिंदर कोतकर यांची निवेदनाद्वारे मागणी

। अहमदनगर । दि.06 मार्च । केडगाव उपनगराची दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या पाहता येथे विद्युतदाहिनीची गरज असून, खासदार निधीतून ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार सुजय विखे पा. यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी बाळासाहेब कोतकर, अजित कोतकर, सुमित लोंढे, ओंकार कोतकर, अनिल ठुबे, लक्ष्मण घोडके, नवनाथ कोतकर, अक्षय कोतकर, मयूर जाधव आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, केडगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, येथे नागरी वसाहतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येथील अमरधाममध्ये विद्युतदाहिनीची बसविणे ही गरज आहे. या ठिकाणी विद्युतदाहिनी बसविल्यास अंत्यविधीसाठी येणाऱ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. तरी खासदार निधीतून या विद्युतदाहिनीची उभारणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे अमरधाममध्ये जागा अपुरी पडत आहे. जर या ठिकाणी विद्युतदाहिनी देण्यात आली, तर होणारी अडचण दूर होण्यास मदत होईल. एकाच वेळी दोनपेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार करायचे असल्यास ते शक्य होत नाही. विद्युतदाहिनी मिळाल्यास कोणालाही ताटकळत थांबावे लागणार नाही. नागरिकांची गैरसोय दूर होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post