उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांचा गौरव

। अहमदनगर । दि.20 मार्च । उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  दर महिन्याला गुन्ह्यांच्या अनुशंगाने विशेष सभेचे आयोजन पोलिस अधीक्षक कार्यालयात करण्यात येत असते. यावेळी महिनाभरात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात येतो. 



यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधीक्षक विशाल ढुमे, नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित पाटील आदी उपस्थित होते.



यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पूर्ण टीम, पोलीस उपअधीक्षक पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, 



संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, टू प्लस योजनेचे पोलीस निरीक्षक, टपालचे अधिकारी तसेच पोलिस दलातील कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post