। अहमदनगर । दि.15 नोव्हेंंबर । नागापूर एमआयडीसीत एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्या सराईत आरोपींची आतंरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
शुभम महादेव खोत (वय 25 रा.टाकळी अंबड ता.पैठण, जि. औरंगाबाद, हल्ली रा.राज हॉटेल, वनराई कॉलनी, एमआयडीसी), अक्षय बंडु कुर्हाडे (वय 24 रा.टाकळी अंबड ता.पैठण, जि.औरंगाबाद,हल्ली रा.वैदुवाडी,भिस्तबाग,सावेडी), राहुल भाऊसाहेब नेटके (वय 20 रा. देवगाव ता.नेवासा, हल्ली रा.मनोरमा कॉलनी, नागापूर) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून सोलर मोटार पंप युनिट, टेम्पोसह एकुण सहा लाख 36 हजार 643 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 8 नोव्हेंबर, 2022 रोजी एमआयडीसी येथुन विजय पोपट घोरपडे (वय 40 रा. माऊली बंगला, विद्या टॉवर शेजारी, नगर कल्याण रोड, नगर) यांचा एमआयडीसी येथील प्लॉट नं. 19 जवळ लावलेला मालवाहतुक टेम्पो अज्ञात इसमांनी चोरी करून नेला होता.
तसेच त्याच रात्री विजयसिंग गुरदिपसिंग सॅम्बी (वय 65 रा. डॉक्टर्स कॉलनी, बुरूडगाव रोड, नगर) यांच्या कंपनीतील सोलार मोटार पंप, कंट्रोलर व केबल असा दोन्ही गुन्ह्यातील मिळुन एकुण सात लाख 45 हजार 24 रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमांनी चोरून नेला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोहर शेजवळ, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, मयुर गायकवाड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे यांचे पथक काम करत होते.
शुभम खोत हा साथीदारासह एका चोरीच्या टेम्पोमध्ये एमआयडीसी येथील गोडावुन मधुन चोरलेला माल भरून नगर-औरंगाबाद रोडने जात आहे, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर (ता. नगर) गावचे शिवारात बातमीतील नमुद संशयीत टेम्पो पकडला. यातील शुभम खोत, अक्षय कुर्हाडे, राहुल नेटके यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे टेम्पो व त्यामधील मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी एमआयडीसी येथुन टेम्पो चोरी केला असुन त्यामध्ये एमआयडीसी येथील गोडावुन मधुन चोरी केलेल्या मोटार कंट्रोलर व केबल घेवुन जात आहे अशी कबुली दिली. ताब्यातील तीनही आरोपींना सहा लाख 36 हजार 643 रूपये किंमतीचा सोलार मोटार पंप युनिट त्यामध्ये कंट्रोलर, केबल बंडल व एक मालवाहु टेम्पो जप्त करून मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags:
Maharashtra
The French cards had been referred to as "Vingt-et-Un," which translates to "Twenty-one." These cards are in all probability derived from card video games Chemin de Fer, which had been popular at the moment. The card recreation was performed at the French Royal Court through the reign 우리카지노 of King Louis XV. Live dealer blackjack is a variant the place the playoffs are dealt by a real dealer.
ReplyDelete