‘आपले ध्येय आज ठरवले तर भविष्य उज्वल होते’: प्रसिद्ध कलाकार श्रीकांत यादव यांचा स्नेहालय दिपोत्स्वात बालकांना संदेश
। अहमदनगर । दि.31 ऑक्टोबर । लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने वंचितांच्या दिवाळीसाठी २९ ऑक्टोबर रोजी स्नेहालयात दीपोत्सव २०२२ साजरा करण्यात आला. गेली १६ वर्ष लायन्स क्लब वंचितांच्या चेहर्यावर हास्य फुलवून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी या अनोख्या दीपोत्सवाचे आयोजन करत आहे.
स्नेहालय व इतर संस्थेतील तसेच शहरातील वंचित, अनाथ, निराधार, दिव्यांग, विकलांग बालकांसोबत दिवाळी साजरी होते. सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने लायन सभासद व बाल कल्याण समितीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येतो. या मेळाव्यात मुलींकरिता मेहंदी, मुलांकरिता टॅटू, विविध खेळ तर पॉपकॉर्न आणि मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतात. मुलांना धमाल करण्यासाठी डी.जे. व झुंबा डान्सचा देखील यामध्ये समावेश होता.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या परिसरात २००० पेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करुन, परिसर उजळविण्यात आला होता. कार्यक्रमा दरम्यान मुलांना चॉकलेटस् इतर खाऊंचे वाटप तसेच लकी-ड्रॉ चे आयोजन करण्यात आले. आकाशातील रंगीबेरंगी अतिशबाजी कार्यक्रमाचे आणखीन एक आकर्षण ठरले. या दीपोत्सवासाठी मराठी सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार श्रीकांत यादव,मकरंद सप्तर्षी ,मंगेश देखणे आदि कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमास लायनचे प्रांतपाल राजेश कोठावडे, रिजन चेअरमन सुनील साठे, डॉ. एस.एस. दीपक, शरद मुनोत, मोहनशेठ मानधना, झोन चेअरमन आनंद बोरा आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन, फराळ वाटप करून झाला. मुलांसाठी किल्ला बनवा, भेट कार्ड बनवा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे बक्षिसे वाटप करण्यात आले. दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मुलांची दिवाळी आनंदी करण्यासाठी व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लब व लियो क्लब चे पदाधिकारी हरजितसिंह वधवा, सिमरण कौर वधवा,हरमन कौर वधवा,अनया बोरा,प्रिया मुनोत,प्रीशा बजाज,प्रणिता भंडारी,अरविंद पारगावकर,नितीन मुनोत,धनंजय भंडारे,दिशा तलवार, प्रशांत मुनोत, विपुल शहा, दिलीप कुलकर्णी, राजवीरसिंह संधू, अभय मेस्त्री,
विजय कुलकर्णी, डॉ. अमित बडवे, डॉ. संजय असणानी, सुधीर लांडगे, सुनील छाजेड, कमलेश भंडारी, सुमित लोढा, प्रीती शाहा, किरण भंडारी व लायन्स व लिओ चे सदस्य तसेच स्नेहालय परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पसपुल आणि तेजल परमार यांनी तर आभारप्रदर्शन धनंजय भंडारे यांनी केले.
---------
💥रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा