। अहमदनगर । दि.01 ऑक्टोबर 2022 । परंपरेनुसार मुंबईतील शिवतिर्थ येथे होणार्या शिवसेना मेळाव्यास नगरमधील शिवसैनिक मोठ्या संख्येने पदयात्रेने रवाना झाले आहेत. या पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम आदिंसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ही पदयात्रेचे माळशेज घाट येथे पोहचली असता, तेथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी श्री.पानसरे यांनी स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, संदिप दातरंगे, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, विठ्ठल जाधव, आकाश दातरंगे, पप्पू भाले, संदेश कार्ले, राजेंद्र भगत, दत्ता जाधव आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अर्जुन दातरंगे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या या दसरा मेळाव्यास राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. आता पक्षप्रमुख उद्धजी ठाकरे या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी नगरमधूनही अनेक शिवसैनिक पायी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. या पदयात्रेचे ठिकठिकाणी स्थानिक शिवसैनिकांच्यावतीने स्वागत होत आहे. या स्वागतने पदयात्रेतील शिवसैनिकही भारावून जात आहेत. तर काही या पदयात्रेही उत्स्फुर्त सहभागी होत आहेत. त्यामुळे हा मेळावा रेकॉर्डब्रेक होईल, असे सांगितले.
------
🔆 भारत जोडो यात्रा समर्थनार्थ शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ
🔆 अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत
