स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
। अहमदनगर । दि.25 सप्टेंबर 2022 । कष्टकर्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हमाल पंचायतीच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. माथाडी कामगारांच्या पगारातील कर्ज हप्ते कपात करण्याचे मागील सरकारने बंद केले होते, परंतु आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने आता पुर्ववत झाले आहे. कष्टकार्यांची आर्थिक प्रगती व्हावी, कौटूंबिक उन्नत्तीसाठी स्व.शंकरराव घुले यांनी या कष्टकरी पतसंस्थेची स्थापना केली. त्यानंतर पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकर्यांचे जीवनमान उंचविण्यास मोठी मदत झाली. आज पतसंस्थेमुळे कष्टकार्यांचे आर्थिक सक्षमिकरण होत आहे. त्यांच्या गरजेवेळी पतसंस्था त्यांच्या पाठिशी उभी आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकर्यांचा होत असलेला विकास हेच पतसंस्थेचे मोठे यश आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी मार्गदर्शन केले. या सभेस कॉ.बाबा आरगडे, पतसंस्थेेचे चेअरमन बबन आजबे, व्हाईस चेअरमन नारायण गिते, सचिव संजय महापुरे, संचालक सचिन ठुबे, जालिंदर नरवडे, दिगंबर सोनवणे, नवनाथ लोंढे, श्रीमती आशाबाई रोकडे, श्रीमती रत्नाबाई आजबे, सचिन करपे, बाळासाहेब म्हसे आदि उपस्थित होते.
यावेळी चेअरमन बबन आजबे म्हणाले, गेल्या 29 वर्षांपासून पतसंस्थेने कष्टकार्यांची समाजात पत निर्माण करण्याचे काम केले आहे. पतसंस्थेने कायम ‘अ’ वर्ग राखला असून, सर्वांना बरोबर घेत पतसंस्थेचा कारभार सुरु आहे. सभादांनसाठी कर्ज मर्यादा सुमारे 1 लाख केली असून, 20 हजार तातडीचे कर्ज वितरित केले जात आहे. सभासदांचा 1 लाख रुपयांचा अपघात विमा असून मयत वारसांना रु.7 हजारांची आर्थिक मदत देण्यात येते.
त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी 10 हजारांचे मदत व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जातात. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या गरजू पुर्ण होत असून, त्यांच्या जीवनात एक स्थैर्य निर्माण झाले आहे. आज अनेक कष्टकरी पतसंस्थेचे सभासद नाही, तरी त्यांनीही पतसंस्थेचे सभासद होत आपली प्रगती साधावा, असे आवाहन केले.
प्रास्तविकात व्हाईस चेअरमन नारायण गिते यांनी पतसंस्थेच्या सन 2021-22 चा आर्थिक ताळेबंद सादर केला. तसेच पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देत. भविष्यात राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा.साखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कॉ.बाबा आरगडे यांनी मादर्शन केले. सूत्रसंचालन सचिव संजय महापुरे यांनी केले. शेवटी सचिन ठुबे यांनी आभार मानले.
या सभेस हमाल पंचायतचे उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, सतीश शेळके, बहिरु कोतकर, रोहिदास ढाकणे, बाळासोहब वडागळे, भाऊसाहेब कोथिंबीरे, राम हरदास, भाऊसाहेब शेळके, वाल्मिक कदम, मुकुंद बोरुडे, वाकचौरे आदिंसह सभासद उपस्थित होते.
