। अहमदनगर । दि.24 सप्टेंबर 2022 । दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नातील दोघांना पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पकडले. येथे संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता तो पाथर्डी तालुक्यातील कासारवाडी येथील राहणार असून नितीन उमेश कासार असे त्याचे नाव असल्याचे त्याने सांगितले तसेच त्याचा साथीदार सचिन संजय मरकड यांनी मिळून चोरी केलेली हिरो होंडा स्प्लेंडर ही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या दोन दुचाकी चोरट्यांकडून अजूनही काही चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
अहमदनगर शहरातून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच आहे. अनेक ठिकाणी सीसी टीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत व त्या आधारावर पोलिस तपास करीत आहेत. नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून काही दुचाकी चोरी गेल्या होत्या. या प्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशन गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मोटारसायकल चोरीचा गुन्ह्यांचा तपास करीत असताना तसेच अहमदनगर शहरातून चोरी गेलेल्या विविध मोटारसायकलींचा शोध घेत असताना सिव्हिल हॉस्पिटल येथील सिक्युरिटी गार्ड यांना पोलिसांनी सूचना देऊन संशय आलेल्या व्यक्तींबाबत पोलिसांना कळविण्यात सांगितले होते.
त्यानुसार एक व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटल समोर लावलेल्या दुचाकींना चावी लावून कुलूप उघडते का याची तपासणी करताना संशयितरित्या आढळून आल्याने सिक्युरिटी गार्डने याबाबत पोलिसांना कळवले होते. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सिव्हीलमध्ये जाऊन त्या संशयितास ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
Tags:
Ahmednagar.L
Crime
