नगर जिल्ह्यात बुधवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी

। अहमदनगर । दि.07 ऑगस्ट ।  नगर शहरासह जिल्ह्यात कलम 144 (1) अन्वये बुधवारी 9 ऑगस्ट रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मोहरमची सांगता 9 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. 8 ते 9 ऑगस्ट या दरम्यान कत्तल की रात्र व ताबूत विसर्जन मिरवणूक अहमदनगर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात साजरी होणार आहे. 

यावेळी कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याकरीता जिल्हा पोलिस अधीक्षक अहमदनगर तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी मनोज पाटील यांनी फौजदारी दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144(1) तथा महाराष्ट्र शासन अधिसूचने अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन 8 ऑगस्ट 2022चे मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 9 ऑगस्टचे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत पुढील कृत्य करण्यास मनाई केली आहे.

यात 1) कपडे काढून अंग प्रदर्शन करणे, 2) बॉडी शो करणे, 3) आक्षेपार्ह अंगविक्षेप करणे, 4) अश्लील हावभाव करणे, 5) अंगावरील कपडे फाडून काढून नाच करणे. तसेच यासंदर्भातील हा आदेश हा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी लागू राहील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post