। अहमदनगर । दि.21 जुन । नगर शहर पाणीपुरवठा योजनेवर बुधवारी (२२ जून) दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणकडून शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिले आहे.
महावितरण व महापारेषण कंपनीकडून ट्रान्समिशन लाइनच्या तातडीच्या तांत्रिक देखभाल दुरूस्ती कामासाठी बुधवारी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. या वेळेत मनपामार्फत पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
दरम्यानच्या काळात मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. परिणामी बुधवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, तसेच स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायकनगर परिसर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
याबाबत गुरुवारी पाणी सोडण्यात येईल. गुरूवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या सर्जेपुरा, सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, या भागात शुक्रवारी पाणी पुरवठा होईल.
----------------
👉 विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 तर काँग्रेंस चा 1 उमेदवार विजयी
👉 वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
👉 सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न