विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 तर काँग्रेंस चा 1 उमेदवार विजयी

विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजप 5, शिवसेना 2, 
राष्ट्रवादी 2 तर काँग्रेंस चा 1 उमेदवार विजयी
 

। मुंबई । दि.20 जुन । विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज विधानभवन येथे पहिले मतदान हरिभाऊ बागडे यांनी केले. दुपारी 4.00 वाजेपर्यंत एकूण 285 सदस्यांनी मतदान केल्याचे मतदान अधिकारी यांनी जाहीर केले.

राज्यसभा निवडणुकीत 10 मते जास्त मिळवणार्‍या भाजपाने विधान परिषद निवडणुकीत नवा रेकॉर्ड केला आहे. विधान परिषदेचं मतदान गुप्त पद्धतीनं होत असल्यामुळे शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता ताणली गेली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीनेही काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, एकंदरीतच आता महाविकास आघडीला विचार करायला लावणारा आहे. याचाच फायदा आता भाजप घेणार का असाही प्रश्न निर्माण होत आहे.

विधान परिषदेच्या आजच्या निवडणुकीत 11 उमेदवार उभे होते. त्यापैकी 10 उमेदवार विजयी झाले असून भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय झाला. उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत.

भाजपा
प्रवीण दरेकर- विजयी 29 मतं
राम शिंदे- विजयी 30 मतं
श्रीकांत भारतीय- विजयी 30 मतं
उमा खापरे- विजयी 27 मतं
प्रसाद लाड- विजयी 28 मतं

काँग्रेस
चंद्रकांत हंडोरे- पराभूत 22 मतं
भाई जगताप- विजयी 26 मतं

शिवसेना
सचिन अहिर- विजयी 26 मतं
आमसा पाडवी-  विजयी 26 मतं

राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे- विजयी 29 मतं
रामराजे नाईक निंबाळकर- विजयी 28 मतं 
---------------
 
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post