। अहमदनगर । दि.13 जुन । पारनेर येथे मोटारसायकलवर येऊन मोबाईल हिसकावणारे दोघे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अब्दुल महेंदरदीन खान (रा. छत्रपती नगर, तपोवन, अहमदनगर), सुखचेन केसरसिंग (रा. छत्रपतीनगर, तपोवन) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोमल दत्तात्रय जाधव (वय 23, रा. करंदी, ता. पारनेर) या मिलन चौक, पारनेर येथे घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहात रस्त्यावर उभ्या असताना स्प्लेंडर मोटार सायकलवर निळ्या व काळ्या रंगाचे शर्ट घातलेले अज्ञात दोन इसम फिर्यादीचे जवळ येऊन हातातील 15 हजार रुपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून पळवून नेला. सदर घटनेबाबत पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा अब्दुल खान रा. तपोवन अहमदनगर याने केल्याची खात्रिशीर माहिती पोनि कटके यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ योगेश सातपुते, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून तपोवन येथे जाऊन आरोपीचा ठावठिकाणा शोधून ताब्यात घेतले.
आरोपीकडे वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे सुखचेन केसरसिंग रा. छत्रपती नगर, तपोवन याचे सह केल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींना गुन्ह्यातील चोरलेला 15 हजार रुपयांचा व्हिवो कंपनीचा मोबाईल काढून दिल्याने तो जप्त केला. आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पार जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
-------------
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर पोस्ट टाकल्याने गुन्हा दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण
Tags:
Ahmednagar