। अहमदनगर । दि.13 जुन 2022। पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्या क्रेटा कारला समोरुन येणार्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात परेश मुरलीधर गडपायले (वय 32, रा. पुणे पिंपरी सौदागर), तसेच सोनिका भीमराव आवसरमोल (32, रा. औरंगाबाद) हे या अपघातात जागीच ठार झाले आहे.
तर तिसरी महिला शिखा मुरलीधर गडपायले (36) या अपघातात क्रेटा कारमध्ये अडकून गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात औषधोपचार सुरु आहे. नगर -औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात हा अपघात झाला.
याबाबत अधिक वृत्त असे की, पुणे येथील पिंपरी सौदागर येथून आपले क्रेटा कार (क्रमांक एम.एच. 14 जे. एक्स 4024) हे वाहन औरंगाबादच्या दिशेने घेऊन जात असताना समोरुन येणार्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे कांगोणी फाटा शिवारात झालेल्या अपघातात
क्रेटा कारमधील परेश गडपायले व सोनिका आवसरमोल (जागीच ठार झाले आहे. तर शिखा गडपायले (36) या कारमध्ये अडकल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील मृतांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी आसपास मदतीला कोणीही नव्हते. त्यानंतर काहींच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र तेथे उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
------------------
जिल्ह्यात आतापर्यंत २७ मिमी पावसाची नोंद
दरोड्यातील ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार : प्रा.वर्षा गायकवाड