जिल्ह्यात आतापर्यंत २७ मिमी पावसाची नोंद

। अहमदनगर । दि.13 जुन । नगर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रविवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली होती. तर काही भागात तुरळक स्वरूपात पाऊस झाला. गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यात ९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक नगर तालुक्यातील जेऊर भागात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद श्रीरामपूर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनच्या पावसाने शनिवारी जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुका वगळता बहुतांशी तालुक्यात हजेरी लावली आहे. रविवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. तर काही भागात तुरळक, हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. 

गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यातील नगर २०.५, पारनेर १.५, श्रीगोंदे ५.५, कर्जत १.५, जामखेड १६.८, शेवगाव १८.१, पाथर्डी ३०, नेवासे ७.८, राहुरी १५.९, संगमनेर १.१, अकोले २.३, कोपरगाव ५.६, श्रीरामपूर ०.६, राहता ६.९ अशा पावसाची नोंद झाली आहे.

-----------

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार : प्रा.वर्षा गायकवाड 

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लगाम! केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जारी

कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती उपबाजारात कांद्याला काय मिळाला भाव 

Post a Comment

Previous Post Next Post