मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्थेच्यावतीने युपीएससी उत्तीर्ण अभिजित पठारे यांचा सत्कार

मराठा सेवा संघ व मराठा  पतसंस्थेच्यावतीने युपीएससी उत्तीर्ण अभिजित पठारे यांचा सत्कार

युवकांचा प्रशासनातील सहभाग प्रशासकीय यंत्रणा सक्षमीकरणास मदत : इंजि.सुरेश इथापे


। अहमदनगर । दि.02 जून 2022 ।प्रशासकीय सेवेत काम करण्यासाठी अनेक युवक इच्छूक आहेत, त्यासाठी ते मेहनत घेऊन जिद्दीने आपले लक्ष साध्य करत आहेत. तरुणांचा प्रशासनात होत असलेला सहभागाने प्रशासकीय यंत्रणा सक्षमीकरणास  मोठी मदत होणार आहे. अभिजित पठारे यांनी कठोर परिश्रमातून युपीएससी परिक्षेत मिळविलेले यश हे आपणा सर्वांसाठी कौतुकास्पद असेच आहे. 

आपल्या कार्यकर्तुत्वाने प्रशासकीय सेवेत आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील. तसेच मनापात चांगल्या पद्धतीने काम करुन शहराच्या विकासात योगदान देणार्‍या सहकार्याना मिळालेली पदोन्नत्ती ही त्यांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. या सर्वांच्या कार्यास मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्थेचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले.

मराठा सेवा संघ व मराठा नागरी पतसंस्थेच्यावतीने युपीएससी परिक्षेत अभिजित बबनराव पठारे उत्तीर्ण झाल्याबद्दल व मनपाचे शाखा अभियंता सदाशिव रोहोकले, मनोज पारखे, गणेश गाडळकर यांना पदोन्नत्ती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे अति.आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, संचालक उदय अनभुले, व्यवस्थापक अशोक वारकड, विजय नवले, अमोल लहारे, राजु जाधव, राम मोकाटे, विकास जाधव आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अति.आयुक्त डॉ.प्रदीप पठारे यांनीही अभिजित पठारे व पदोन्नत्ती झालेल्यां मान्यवरांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या. प्रास्तविकात व्हाईस चेअरमन सतीश इंगळे यांनी पतसंस्थेच्यावतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच समाजात चांगले काम करणार्‍यांचा नेहमीच सन्मान केला असल्याचे सांगितले.

यावेळी अभिजित पठारे सत्कारास उत्तर देतांना सांगितले, कोणत्याही क्षेत्रात काम करतांना जिद्द, चिकाटी, मेहनत याची आवश्यकता असते. आपले ध्येय निश्चित करुन त्यादृष्टीने वाटचाल केल्यास यश मिळतेच. आजच्या सत्काराने मला प्रोत्साहन मिळत राहील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय अनभुले यांनी केले तर आभार अशोक वारकड यांनी मानले.


 

Post a Comment

Previous Post Next Post