नगर जिल्ह्याचा विद्यार्थी अभिजीत पठारे युपीएससी उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार संपन्न
शेतकऱ्याच्या मुलाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन बहुमान मिळविला : नगरसेवक अनिल शिंदे
। अहमदनगर । दि.02 जून 2022 । आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. तरी आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणा मध्ये ध्येय निश्चित करून चिकाटीच्या व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे ग्रामीण भागातील विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादित करताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांची मुले आयएस दर्जाचा अधिकारी म्हणून काम करीत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत अजिभीत पठारे याने युपीएससी परीक्षेमध्ये देशात 333वा क्रमांक मिळवू नगर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशपातळीवर उंचावले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणामध्ये यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील अभिजीत बबन पठारे हा विद्यार्थी युपीएससी स्पर्धा परीक्षेत देशात 333 व्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याबद्दल त्याचा सत्कार करताना ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, मा.शहरप्रमुख दिलीप सातपुते, वडील बबन पठारे, आई लता पठारे, संजय तरटे, बाळासाहेब ठुबे, बाबासाहेब पठारे, उद्योजक अरविंद गुंदेचा, मेहुल भंडारी, आशिष शिंदे, ओंकार शिंदे, गौरव शिंदे, संतोष भालसिंग आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिजीत पठारे म्हणाले की, शालेय शिक्षण घेत असताना आयएएस अधिकारी होण्याचा मानस मनात बाळगला होता. ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने अभ्यास सुरू करून वाटचाल केली सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे मला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळाला या पदाच्या माध्यमातून चांगले काम उभे करू असे ते म्हणाले.