। अहमदनगर । दि.24 मे । येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता संजय ढवण (वय 57,रा.श्रीरामपूर) याला 19 हजारांची लाच धेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याबाबतची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
ठेकेदारी करणार्या एकाने चिचोंली गुरव येथील तीन लाखांचे काम घेतले होते, या कामाची कायदेशीर किंमत पूर्ण केल्यानंतर यासाठीची आगाऊ रक्कमेमध्ये त्याने पंचायत समितीकडे जमा केली होती.
काम पुर्ण केल्यानंतर कनिष्ठ अभियंता संजय ढवण हा बांधकाम साइटवर जाऊन त्याची पाहणी करण्यास व त्याचा कार्यालयीन अहवाल देण्यास टाळाटाळ करीत होता.
याबबात कंत्राटदाराने त्याची भेट घेतली असता त्याने आपल्यासाठी 15 हजार आणि दर्जा तपासणीस अधिकाकर्यासाठी चार हजार रुपये अशी एकूण 19 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची तक्रार केली.
यानंतर सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभगाने सापळा लावुन विशिष्ठ खुना केलेल्या नोटा दुपारी तक्रारदाराने कनिष्ठ अभियंत्याला दिल्यानंतर लाचलुचपत पथकाने त्याला जेरबंद केले.
----------------
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेंशन अदालत’ चे आयोजन
मेडद किल्ला परिसराचे सुशोभीकरण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
Tags:
Breaking