नगर तालुक्यातील पावसामुळे कांदा उत्पादकांची पळापळ

। अहमदनगर । दि.21 मे 2022। गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान नगर तालुक्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह अल्प प्रमाणात सोसाट्याचा वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या पावसाने चांगलीच धसका घेतला. कांदा चाळी आणि उघड्यावर टाकलेला कांदा झाकण्यासाठी पळापळ झाली. 

अठरा मे नंतर अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यानुसार राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह तालुक्यातही गुरुवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाने सलामी दिल्याचे पाहावयास मिळाले. नगर तालुक्यातील अनेक भागात कांदापीक काढणी सुरू आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पीक शेतातच काढून पडले आहेत.

गुरुवारी काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह दहा ते पंधरा मिनटे जोरदार पावसाच्या सरी बारसल्या. यामध्ये शहरासह एमआयडीसी परिसर, साकतखुर्द, दहिगाव, वाटेफळ, जेऊर, वाळकी, देऊळगाव सिद्धी, सारोळा कासार, खडकी, अरणगाव, चास, कामरगाव, नेप्ती, हिंगणगाव, निंबळक, विळद, पिंपळगाव माळवी, डोंगरगण आदी भागात पावसाने हजेरी लावली.

Post a Comment

Previous Post Next Post