ट्रॅव्हल बसमधून दागिने व रक्कमेची चोरी


। अहमदनगर । दि.23 मे ।  ट्रॅव्हल बसने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाच्या पर्समधील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून चोरून नेला.

घटना नगर-पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील हॉटेल आशीर्वाद समोर घडल्याचे निदर्शनास आले. रोशन हरिभाऊ जवंजाळ (राहणार कांडली परतवाडा, अचलपूर. हल्ली राहणार डीएके सुंदर्बन सोसायटी, पवार पब्लिक स्कूल जवळ) या

युवा ट्रॅव्हल्सच्या बसमधून (क्रमांक एमएच 12 एमबी 5505) प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील सोन्याची मोहन माळ, कानातील सोन्याचे झुमके व पाच हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड, महाराष्ट्र बँक डेबिटकार्ड तसेच अ‍ॅक्सिस बँकेचे डेबिटकार्ड चोरून नेले.

याप्रकरणी रोशन जवंजाळ यांनी सुपा पोलीस ठाणे येथे दिलेली फिर्याद नगर तालुका पोलिसांना ऑनलाईन प्राप्त झाल्याने नगर तालुका पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मारग करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post