अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण याञेची पालखी सोहळयानी सांगता
। अतनूर । दि.12 मे 2022 । जळकोट तालुक्यातील अतनूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.काशी विश्वनाथ मठ संस्थान अतनूर यांच्या कृपेने जिवंत समाधी घेणारे श्री. सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४६ व्या. संजिवनी सोहळयानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास रविवारपासून (दि.१) मे सकाळी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज यांना रूद्राभिषेकाने प्रारंभ झाला.
या सप्ताहात दि.९ मे पर्यंन्त खालीलप्रमाणे या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा प्रमाणे सकाळी ६ ते ७ श्री.घाळेप्पा स्वामी यांचा रूद्राभिषेक, सकाळी ७ ते १० श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथ्यावरील भजन, दुपारी २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, राञी ९ ते ११ हरीकिर्तन, १२ ते ४ हरीजागर, पहाटे ४ ते ६ काकडाआरती असे नित्य नियमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात रविवारी ( दि.१ ) ह.भ.प. प्रकाश महाराज साठे ( झीज टाकीन फेम ) यांचे किर्तन होणार आहे.
दि.२ सोमवारी रोजी ह.भ.प. दिपक महाराज, दि.३ मंगळवारी रोजी ह.भ.प. रूपालीताई पाटील, दि.४ बुधवारी रोजी ह.भ.प. आशाताई राऊत, दि.५ गुरूवारी रोजी ह.भ.प. सुरेंद्र महाराज, दि.६ शुक्रवारी रोजी ह.भ.प. राजेश महाराज, दि.७ शनिवारी रोजी ह.भ. प.बाळासाहेब शिंदे जालनाकर, दि.८ दुपारी ह.भ.प. विश्वनाथ महाराज अतनूरकर, यांचे गुलालाचे किर्तन होऊन रात्री ह.भ.प.गोरख महाराज धोंडीहिपरगा यांचे कीर्तन, दि.९ सोमवार रोजी पहाटे ५:३० वाजता श्री.काशी विश्वनाथ महाराज व जिवंत समाधी घेतलेले श्री.सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या भव्य दिव्य नेत्रदिपक पालखी सोहळयानी व ह.भ.प.निरंजन भाईजी महाराज वसूर यांचे काल्याचे किर्तनानी दुपारच्या वेळी सांगता झाली.
या याञेत अतनूर परिसरातील २२ गावातील वाडी-तांडा-वस्तीतील ग्रामस्थांना भंडारा-महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमास अतनूर, गव्हाण, चिंचोली, गुत्ती, देवूळवाडी, कोदळी, तग्याळ, डोरनाळी, वडगाव, नेवळी, दापका ( गुंडोपत ) जि.नादेंड, मरसांगवी येथील भजनीमंडळ, विविध जिल्हयातून प्रसिध्द किर्तनकार येणार आलेले होते. यावेळी विणेकरी, ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख, मृदंगवादक, गायक, हरीपाठ प्रमुख, हरीजागर प्रमुख, काकडाआरती, चोपदार ईत्यादी प्रमुखांच्या निवडी नावानिशी केलेल्या होत्या. यांना सकाळी, दुपारी आणि सायंकाळी गावातील, परगावातील अन्नदाते अन्नदान केले. दि.९ रोजी दुपारी ४ वाजता दणदणीत जंगी कुस्तीचा कार्यक्रमही संपन्न झाला.
