धनादेश अनादर प्रकरणी एकास सहा महिन्याची कैद व दंडाची शिक्षा


। अहमदनगर । दि.16 मे 2022। धनादेश अनादर प्रकरणी स्वप्नील भास्कर शेटे यास 6 महिने कैदेच्या शिक्षेसह 19 लाख 78 हजार 500 रुपयांचा दंड ठोठविण्यात आला. संजय पांडूरंग आडोळे यांच्याकडून घेतलेल्या उसनवार 15 लाख रकमेच्या परतफेडीपोटी दिलेले दोन धनादेश न वटल्याच्या खटल्यामध्ये 

अहमदनगर येथील न्याय दंडाधिकारी यांनी स्वप्नील भास्कर शेटे (रा.सावेडी, अहमदनगर ) यास दोन्ही खटल्यामध्ये दोषी धरुन 6 महिने कैदेची व रक्कम रुपये 19 लाख 78 हजार 500 नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली. तसेच ही रक्कम फिर्यादीस देईपर्यंत दर साल दर शेकडा 9 टक्के दराने व्याजासह एक महिन्यामध्ये देण्याची शिक्षा सुनावली.

या खटल्याची हकिकत अशी की, यातील स्वप्नील भास्कर शेटे याने संजय पांडूरंग आडोळे यांच्याकडून प्लॉट घेण्यासाठी व घर बांधणीसाठी रक्कम रुपये 15 लाख हातउसने घेतले आहेत व या रकमेच्या परतफेडी पोटी स्वप्नील शेटे याने संजय आडोळे याला दोन चेक दिले होते. परंतु हेे दोन्ही चेक वटले नाही. 

म्हणून आडोळे याने शेटेविरुद्ध खटला दाखल केला होता. या दोन्ही खटल्यांची चौकशी होऊन न्यायालयाने स्वप्नील शेटे यास दोषी धरुन दंड व शिक्षा सुनावली. संजय आडोळे याच्यावतीने अ‍ॅड.एस.ए.काकडे व अ‍ॅड.जी.आर.पाटील यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post