। नवी दिल्ली । दि.21 मे 2022 । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी आणि डिझेलवर ६ रुपयांनी मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.
त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली त्यांनी म्हणले आहे की, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ₹ 8 आणि डिझेलवर प्रति लीटर ₹ 6 ने कमी करत आहोत.
यामुळे पेट्रोलचे दर ₹ 9.5 प्रति लिटर आणि डिझेलचे दर ₹ 7 प्रति लिटरने कमी होतील. सरकारच्या महसुलावर या निर्णयामुळे वार्षिक सुमारे ₹ 1 लाख कोटींचा परिणाम होणार आहे."
उत्पादन शुल्क कमी केल्याची घोषणा त्यांनी ट्विटच्या माध्यमातुन केली यात त्यांनी म्हणले आहे की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून, आमचे सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.
आम्ही गरीब आणि मध्यमवर्गाच्या मदतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. परिणामी, आमच्या कार्यकाळातील सरासरी महागाई मागील सरकारच्या काळा पेक्षा कमी राहिली आहे