। अहमदनगर । दि.14 एप्रिल । जिल्हयात संघटीतपणे गुन्हे करणार्या दोन टोळ्यांचे हद्दपारीचे आदेश उच्च न्यायालयात कायम झाले आहेत. नितीन धिवर व सागर विठोबा कर्डिले यांच्या टोळींवर करण्यात आलेल्या हद्दपारीच्या कारवाईला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने ते फेटाळल्याने या टोळ्यांवरील हद्दपारीचे आदेश कायम झाले आहेत.
जिल्हयातील टोळीप्रमुख नितीन आण्णा धिवर (वय 32, रा. भीमनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अ.नगर) व टोळी सदस्य सचिन सीताराम गायकवाड (वय 32 रा. भीमनगर, शिर्डी,ता.राहाता, जि. अ.नगर) यांनी संघटीत टोळी तयार करुन शिर्डी पोलीस ठाणे, राहाता तालुका हद्दीत तसेच नगर जिल्हा परिसरात संघटीतपणे गैरकायदा मंडळी जमवणे, अनाधिकाराने घरात प्रवेश करणे,
मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्र चाकु, तलवार जवळ बाळगून दुखापत करणे, किरकोळ कारणावरुन गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन दहशत निर्माण करीत असल्याने नगर जिल्हा परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी तसेच या टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी
व टोळीच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी या टोळीचे टोळीप्रमुख व टोळीतील इतर एक सदस्यांना कारवाई करुन 18 महिन्यांकरीता जिल्हा हद्दीतून हद्दपारीची अंतिम कारवाई करुन हद्दपारीचा आदेश जारी केला होता. त्यावर त्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अपिल दाखल केले होते. त्याची सुनावणी होऊन जिल्हा हद्दीतून हद्दपार केलेला आदेश कायम केला आहे.
-------------
खालील बातम्या देखील वाचा...
चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
