ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या गाडीला अपघात

 

। जालना । दि.14 एप्रिल । सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 8 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री आठच्या सुमारास इंदोरीकर महाराज जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला धडक बसली. 
 

यामध्ये त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक  संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शाम पांढर पोटे,नरेंद्र चव्हाण, दीपक खरात घटनास्थळावर दाखल झाले.

जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. 

-------------------

खालील बातम्या देखील वाचा...

राज्यात सीएनजी, पीएनजी दुसऱ्यांदा ५ रुपयांनी महागला

सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ’अमृत जवान’ अभियान: भुसे 

जिल्हा परिषद शाळांच्या वीजबिलासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Post a Comment

Previous Post Next Post