अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ, 13 पर्यंत पोलीस कोठडी
। मुंबई । दि.11 एप्रिल । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणार्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘सिल्व्हर ओक’ हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असलेले एसटी कामगारांचे वकील अॅड.सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदावर्ते यांना देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्यांना पुन्हा एकदा कोर्टात आणण्यात आले होते. यावेळी युक्तीवाद करताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाकडे सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली.
या घटनेतील चार आरोपी अजूनही ताब्यात आलेले नाही. त्यांना ताब्यात घ्यायचे आहे. तसेच आरोपीला जे फोन आले होते त्याची माहिती आरोपी देत नाहीत, ते कोणत्याही प्रकारची माहिती देत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांना कॉल आला होता, त्याची माहिती घ्यायची आहे. तेव्हा पोलीस कोठडी वाढवून द्या, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती.
--------------
खालील बातम्या देखील वाचा....
त्या कर्मचार्यांना सेवेत घेता येणार नाही! : परिवहनमंत्री
उदयनराजे देणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास बुलेट
मांडवी नदीवर भक्कम पूल उभारला जाणार : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
Tags:
Maharashtra
