नगरमध्ये उद्या बॉडी बिल्डींग स्पर्धा

। अहमदनगर । दि.11 एप्रिल । अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र बॉडी बिल्डिर्स असोसिएशनच्या मान्यतेने येत्या बुधवारी (दि.13 एप्रिल) मिलन हॉटेल, सर्जेपुरा चौक येथे ‘बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन तुकाराम गायकवाड व सिराज शेख यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

ही स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो व 75 किलो वरील अशा सहा वजन गटात होणार आहे. यातील प्रत्येक गटातील विजेत्या पाच खेळाडूस ट्रॉफी, सर्टिफिकेटस्, रोख रक्कम, मेडल, बॅग देण्यात येणार आहे. टायटल विजेत्यास ट्रॉफी, रोख रक्कम, मानाचा बेल्ट देण्यात येईल. तसेच बेस्ट फिजिक ही स्पर्धाही होईल.

स्पर्धा यशस्वीतेसाठी महेशदादा सातपुते, जावेद सय्यद, विक्रम भोगाडे, नितीन पारखे, विश्रांती आढाव, प्रविण घावरी, हनिफ शेख, दत्ता रणसिंग, सोहेल शेख, जावळे, नाना घोरपडे, महेश गोसावी, केतन नवले, जेम्स ससाणे, तौसिफ शेख, शाह मन्सूर सुभेदार, केतन देशमुख, 

भैय्या बॉडी बिल्डर, इम्रान शेख, माजीद तांबटकर, मजहर तांबटकर, संजय सुरवसे, मयुर फलके, सागर येवले, संतोष गायकवाड आदी प्रयत्नशील असल्याचे असोसिएशनचे सेक्रेटरी जयंत गिते (मो.9850943493) यांनी सांगितले.

------------------------ 

खालील बातम्या देखील वाचा...

अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ... 

त्या कर्मचार्‍यांना सेवेत घेता येणार नाही! : परिवहनमंत्री 

उदयनराजे देणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास बुलेट

Post a Comment

Previous Post Next Post