उदयनराजे देणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास बुलेट


। सातारा । दि.11 एप्रिल । प्रतिनिधी । महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने स्पर्धा संयोजकांकडून ’कॅश प्राईज’ मिळाले नसल्याची खंत व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर आता सातार्‍यातून बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे.

सातार्‍यातील विविध राजकीय गटातटांमध्ये बक्षिसाची अहमहमिका सुरू झाली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाच लाख रुपयांचे देण्याचे आश्वासन दिले आहे.

तर त्यांचेच समर्थक रक्षक ग्रुपचे नेते सुशिल मोझर यांनी दीड लाखांचे बक्षीस पृथ्वीराज पाटील याला जाहीर केले. तसेच, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नवी बुलेट देण्यात येणार आहे.

कै.श्री.छ. प्रतापसिंह महाराज तालीम संघातर्फे पृथ्वीराज पाटील यांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बुलेट देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर यांनी सांगितले.

रक्षक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुहातर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आजच रात्री महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी एक लाख 51 हजार रुपयांची मदत कोल्हापूरला पाठवत असल्याचे रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशिल मोझर यांनी जाहीर केले.

----------------- 

खालील बातम्या देखील वाचा...

 ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटील, उपविजेता विशाल बनकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

फॅमिली कोर्ट बार संघटना अध्यक्षपदी अ‍ॅड. कराळे 

दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

Post a Comment

Previous Post Next Post