अचानक लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक


। अहमदनगर । दि.18 एप्रिल । संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बिकानेर ढाब्या समोर स्पेअर पार्ट घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. या आगीत ट्रक जाळून खाक झाला. 

ही घटना रविवारी पहाटे ३ वाजता घडली. चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक महामार्गाच्या कडेला लावला. ट्रक (एमपी ०९ एचजी ०११२) पुण्याहून नाशिकला चालला होता. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी आले. 

आग विझवण्यासाठी संगमनेर नगरपरिषद व थोरात कारखान्याच्या अग्निशमक बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोवर ट्रक मधील स्पेअरपार्टची आगीमुळे राख झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post