राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे मंगळवारी अहमदनगर दौर्‍यावर

। अहमदनगर । दि.17 एप्रिल । राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे मंगळवारी अहमदनगर दौर्‍यावर येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ८ वाजता येणार असुन आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालय मध्ये साडेनऊ वाजता चार्टर अकाउंटंन संघटनेची बैठक घेणार आहेत 

त्यानंतर  साडेदहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या जिल्हा कार्यालयात चव्हाण सेंटर व यशस्विनी अभियान बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास आदेश चंगेडिया यांच्या घरी राखीव, दुपारी पावणे दोनच्या सुमारास हातमपूर येथील वास्तु संग्रहालयास भेट देणार आहे 

नंतर अडीचच्या सुमारास राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शहर पदाधिकाऱ्यांचा संवाद, साडेतीनच्या सुमारास ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा संवाद तर पाचच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post