। अहमदनगर । दि.17 एप्रिल । येथील जंगूभाई तालमीच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने तोफखाना येथील संबोधी विद्यालय समोरील हनुमान मंदिरात जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला
हनुमान जयंतीनिमित्त पहाटे हनुमान मंदिरांत महाआरती,लघुरुद्राभिषेक,पूजा मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली “जय हनुमान...जय श्रीराम’असा जयघोष करण्यात आला.भाविकांची मंदिरांत दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती.
तर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यामध्ये गोड शिरा,पुरीभाजी,सांबार भात आदी पदार्थ होते यावेळी राजू मामा जाधव,एड.धनंजय जाधव,अभिमन्यू जाधव ,आदिनाथ जाधव,ज्ञानेश्वर दौंडकर,शिवदत्त पांढरे,सोमनाथ जाधव,किशोर परदेशी,दिनेश कापरे,प्रसाद कामूनी,सुनील सुडके आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते
नगरमध्ये“जय हनुमान ज्ञान गुन सागर।जय कपीस तिहुँ लोक उजागर॥राम दूत अतुलित बल धामा।अंजनि पुत्र पवनसुत नामा॥ महाबीर बिक्रम बजरंगी...’अशा प्रकारे हनुमान चालिसाचे गीत जागोजागी ऐकावयास मिळत होते.कोरोनामुळे दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात भाविक मंदिरात पूजाविधी करताना दिसत होते.सकाळीच होमहवन,अभिषेक, हनुमान चालिसा,महामंत्र आणि महाआरती त्याचबरोबर ठिकठिकाणी खिचडी,फळ,शीतपेयाचे वाटप केले जात होते.
यावेळी बोलताना अभिमन्यू जाधव म्हणाले हनुमान जयंती निम्मित नगर शहर व परिसरात आम्ही अनेक मंदिरांना साउंड सिस्टीम भेट दिल्या आहेत,वर्षभर आम्ही विविध कार्यक्रम राबवितो भगवान हनुमान हे वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी
यांचा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा रामायणात आढळतात. भारतात रामकथा प्रसिद्ध असून पुढील वर्षी त्याचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
