महिलेला मारहाण करणार्‍या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.24 मार्च । सासरी नांदत असलेल्या विवाहितेला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून मारहाण केल्याची घटना नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे घडली. या प्रकरणी विवाहितेने तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती, सासु-सासरे, नणंद-नंदई अशा पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते 22 मार्च 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना नणंद आणि सासूने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून मारहाण केली. ‘तू जर कोणाला काही सांगितले तर तुला नांदवणार नाही’, असा दम दिला. पती, सासरे व नंदई यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. सासरे यांनी वडील व मामा यांना फोन करून, ‘तुमची मुलगी घेऊन जा’, असे सांगितले. 

वडील व मामा घरी आले असता सासर्‍याने मामाला लाकडी दांडक्याने मारहाण केली व वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

खालील बातम्या वाचा...

अनिल देशमुख यांच्या मुंबई उच्च न्यायालयने जामीन जामिनासाठी धाव 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर 

सुप्रिया सुळेंचा इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला टोला 

Post a Comment

Previous Post Next Post