बौद्ध महासभेच्या वतीने बौद्धाचार्य प्रमाणपत्र परिक्षेचे आयोजन


। अहमदनगर । दि.19 मार्च । भारतीय बौद्ध महासभा (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया)च्यावतीने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या आदेशाने केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने दि.27 मार्च 2022 रोजी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.27 रोजी नालंदा बुद्धविहार, नालेगाव, अहमदनगर येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत लेखी परिक्षा व तोंडी परिक्षा दु.1 ते 5 या कालावधीत होईल. ही परिक्षा एकूण 200 गुणांची असेल.

परिक्षेसाठी मुख्य परिक्षक राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेश पवार (मुंबई) हे गाथा सुत्रपठण घेणार आहेत. तसेच उप मुख्य परिक्षक विभगीय सचिव पालकमंत्री अनिकराव गांगुर्डे (नासिक) हे विधी प्रात्यक्षिके घेतील. परिक्षक म्हणून नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड,  सभा धारिष्ट्ये व सरचिटणीस राजेंद्र साळवे हे सामान्य ज्ञान या विषयावर परिक्षा घेणार आहेत. परिक्षेसाठी किमान एस.एस.सी.पास, तीन पासपोर्ट फोटो, श्रामणेर सर्टिफिकिटस, प्रवेश फी 300,् आवश्यक आहे.

तरी जास्तीत जास्त श्रामणेरार्थींनी या परिक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महासभेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भगवतं गायकवाड (मो.9850613385), राजेंद्र साळवे (मो.9850479424), माधवराव चाबुकस्वार (मो.9881011134), विजय मेढे (मो.9975434177) यांची संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post